मोहाली: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही संघाच्या एकमेकांविरुद्धच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारतच ऑस्ट्रेलियासमोर वरचढ ठरला आहे. नुकत्याच झालेल्या सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-0नं व्हाईट वॉश केलं होतं. 


आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध 12 टी 20 मॅच खेळले आहेत. यापैकी 8 मॅच भारतानं तर 4 मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकल्या आहेत. तर भारतामध्ये झालेल्या 2 पैकी दोन्ही मॅच जिंकण्यात भारताला यश आलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे आणि 2 मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


टी 20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि भारत 4 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यापैकी 2 मॅचमध्ये भारताचा तर 2 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. 


2007 आणि 2014 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं, तर 2010 आणि 2012 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.