मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना गुजरात लायन्स या नव्या संघाकडून खेळतोय. मात्र नव्या संघाकडून खेळताना त्याच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. कारण नव्या संघात खेळणे म्हणजे जुने घर सोडल्यासारखे आहे, असे रैनाचे म्हणणे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या आयपीएलच्या हंगामात सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. मात्र आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सीएसकेवर बंदी घालण्यात आलीये. आता तो गुजरात लायन्सकडून खेळणार आहे. हे म्हणजे आठ वर्षे राहिल्यानंतर ते घर सोडण्यासारखे आहे. मी आठ वर्षांपासून आयपीएल खेळतोय. ज्यांच्यासोबत मी खेळलोय त्या सीनियकडून मी खूप चांगल्या गोष्टी शिकलोय. 


या नव्या संघात रैनासह ड्वायेन ब्राव्हो आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रँडन मॅकक्युलम यांसारखे क्रिकेटपटू आहेत. संघात अनेक युवा क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आम्हीही या हंगामात खेळण्यास उत्सुक आहोत. गुजरातकडे आयपीएल संघ नव्हता. ही गुजरातवासियांसाठी चांगली संधी आहे, असे रैनाने यावेळी सांगितले.