सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं
सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
मुंबई : सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल.