टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट
वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
नागपूर : वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
दोन्ही संघ जबरदस्त तयारी करतायंत. आजचा मुकाबला हा कांटे की टक्कर होणार. चांगला खेळ हा आजचा विजयाची गुरु किल्ली असेल परंतू या सगळ्यात एक गोष्ट विलन ठरु शकते.
नागपूरमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून देखील पावसाचं वातावरण दिसतंय. पावसामुळे खेळपट्टी ओली आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाचं सावट आहे आणि पहिल्याच मॅचवर पाऊस पाणी फेरू शकतं.
सामना देखील वेळेवर सुरु होणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे क्रिकेट प्रेक्षकांसाठी देखील ही बॅड न्यूज आहे.