बंगळुरू : पुण्यानंतर बंगळुरू टेस्टमध्येही भारतीय बॅट्समनची पडझड सुरुच आहे. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा पहिला डाव १८९ रन्सवर संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायननं भारताच्या ८ बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताकडून लोकेश राहुलनं ९० रन्सची एकाकी झुंज दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भारतानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पुण्यातल्या दारुण पराभवानंतर भारतानं जयंत यादवऐवजी करुण नायरला टीममध्ये संधी दिली पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.