पुणे : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 333 दारूण पराभव झाल्यावर टीम इंडियाने मॅच संपल्यावर तिसऱ्याच दिवशी ताम्हाणी घाटात ट्रेक केला. विराट कोहली, अश्विन, उमेश यादव, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे ताम्हीणी घाटात गेले होते. अजिंक्य रहाणेसोबत त्याची पत्नीही ट्रेकवर गेली होती. तर रविंद्र जडेजा ताम्हीणी घाटात तिरंगा घेऊन गेला होता.


या सगळ्यांचा ताम्हाणीघाटातल्या ट्रेकचा थरारक व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विट केला आहे. याचबरोबर या सगळ्या खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर या ट्रेकचे फोटोही शेअर केले आहेत.