पुण्यातल्या पराभवानंतर टीम इंडिया ताम्हाणीघाटावर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला.
पुणे : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला. ही टेस्ट मॅच तिसऱ्याच दिवशी संपल्यामुळे भारतीय टीम ताम्हाणी घाटावर ट्रेकसाठी गेली होती.
विराट कोहली, अश्विन, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे ताम्हाणीघाटावर गेले होते. मुख्य म्हणजे या ट्रेकिंगला अजिंक्य रहाणेबरोबर त्याची पत्नीही होती.
तर रवींद्र जडेजा ताम्हाणी घाटावर तिरंगा घेऊन गेला होता.
या सगळ्यांनी ट्रेकिंगचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी टेस्ट बंगळुरूमध्ये शनिवारपासून सुरु होत आहे. यामध्ये मिळालेल्या फावल्या वेळाचा कोहलीच्या टीमनं ट्रेकिंगसाठी वापर केला आहे.