`आम्रपाली`नं टीम इंडियाला फसवलं
अनेक रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप होत असलेल्या आम्रपाली ग्रुपवर आता टीम इंडियाचीही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
मुंबई: अनेक रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप होत असलेल्या आम्रपाली ग्रुपवर आता टीम इंडियाचीही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या 11 खेळाडूंना फ्लॅट देण्याची घोषणा आम्रपालीनं केली होती. पण 5 वर्षानंतरही या खेळाडूंना फ्लॅट मिळाला नाही. हरभजन सिंग यानं हे ट्विट केलं आहे.
हरभजनच्या या ट्विटनंतर आम्रपाली ग्रुपनं प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भारतीय संघाला फ्लॅट देण्याच्या घोषणेवर आजही कायम आहोत, असं आम्रपाली ग्रुपचं म्हणणं आहे.
धोनीनं दिला राजीनामा
आम्रपाली ग्रुपच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदाचा राजीनामा दिलेल्या धोनीचंही हरभजननं कौतुक केलं आहे. वेल डन असं ट्विट हरभजननं केलं आहे.
'आम्रपाली'मध्ये घरं घेतलेल्या रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. या कंपनीनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, तसंच घरांची काम अर्धवट ठेवल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे.
त्यामुळे धोनीनं आम्रपालीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदाचा राजीनामा द्यावा अशा मागणीची मोहीम ट्विटरवर सुरु झाली होती. त्यानंतर धोनीनं हे पाऊल उचललं.