मुंबई: झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यातल्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीममध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये मात्र फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वेविरुद्ध भारताची वनडे सीरिज आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्ध भारत चार टेस्ट खेळणार आहे. यातल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी 20 मॅचच्या सीरिजसाठी धोनी भारताचा कॅप्टन असणार आहे, तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी कोहलीकडे कॅप्टनशीप देण्यात आली आहे. 


झिम्बाब्वे दौऱ्यात कोणाला संधी ?


एम.एस.धोनी(कॅप्टन), के.एल.राहुल, फैज फैजल, मनिष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्सर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिन्दर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनादकट, युझुवेंद्र चहाल


वेस्ट इंडिज दौऱ्यात कोणाची निवड ?


विराट कोहली (कॅप्टन), मुरली विजय, शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्दधीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, स्टुअर्ट बिनी