भारतीय टीमला मिळाला नवा `विराट`
आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.
मुंबई : आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.
विराटच्या जागी कोणाला खेळवावे याबाबतची चर्चा निवड समितीमध्ये आहे. विराटची जागा भरून काढणारा खेळाडू बीसीसीआयला हवा आहे. त्यामुळे एक नाव समोर येतंय ते म्हणजे आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स कडून खेळणाऱ्या करुण नायर याचं.
आयपीएलमध्ये नायरने निवड समितीला चांगलंच प्रभावित केलं आहे. यामुळे त्याला भारतीय संघात जागा मिळू शकते. करुणने हैदराबाद विरोधात ५९ बॉलमध्ये ८३ रन्स केले होते. ज्यामध्ये ८ चौकार आणि ३ सिक्स लगावले होते.
करुण हा देखील तीन नंबरवर बँटींग करतो. विराट देखील याच नंबरवर खेळतो. करुण शिवाय मुरली विजय, केएल राहुल यांना देखील संधी मिळू शकते. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना देखील आराम दिला जावू शकतो.
हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याने देखील सेलेक्टर्सला खूपच प्रभावित केलं आहे. कृणालने आयपीएलमध्ये बॉलिंग आणि बॅटींग या दोघांनी प्रभावित केलं आहे. १२ दिवसाच्या या जिम्बॉब्वे दौऱ्यावर काही नवे चेहरे दिसू शकता.