नवी दिल्ली : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यानची ही मालिका जुलै महिन्यात सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांदरम्यान मालिका होत असल्याने आनंद झाल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात चार कसोटी सामने खेळवले जातील.


२०१४मध्ये जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी मानधनाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मालिका अर्धवट सोडून ते मायदेशी परतले होते. त्यानंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिजसोबतचे सर्व प्रस्तावित सामने रद्द केले होते. दरम्यान, या दौऱ्याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.