मुंबई : बुधवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर देशभरात होळीसोबतच 'टीम इंडिया'च्या विजयाची दिवाळीही साजरी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, या सेलिब्रेशनमध्ये विजयाचे शिल्पकार तरी कसे मागे राहतील? भारतीय क्रिकेट संघानेही आज दमदार होळी साजरी केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने याविषयीचे व्हिडिओज ट्विटरवर पोस्ट केलेत.



या व्हिडिओमध्ये विराट कोहली, युवराज सिंग, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रोहीत शर्मा, हरभजन सिंग एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. 



दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही चाहत्यांसोबत होळी साजरी केली आहे. टी-२० विश्वचषकात व्यस्त असले, तरी भारतीय संघाने त्याचे सेलिब्रेशन केले आहे.