`त्या` दोन नोबॉल्सने निराशा केली
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धोनी आणि कंपनीला वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले.
मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धोनी आणि कंपनीला वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले.
यासाठी धोनीने त्या नो बॉल्सना जबाबदार धरलेय. अश्विन आणि हार्दिकच्या त्या दोन नो बॉल्समुळे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर जावे लागल्याची खंत त्याने पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली.
१८ धावांवर खेळत असताना अश्विनच्या नोबॉलवर सिमन्सला जीवनदान मिळाले. त्यानंतर ५० धावांवर पंड्याच्या बॉलवर त्याला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. या दोन नोबॉलमुळेच सिमेन्सला नाबाद ८२ धावांची विजयी खेळी करता आली.
सुरुवातीला टॉस हरलो. त्यानंतर अर्धा तास आधीच म्हणजे सात वाजता सामना सुरु झाला. मात्र गोलंदाजी करताना दवामुळे स्पिनर्सना नीट कामगिरी करता आली नाही. दव पडल्यामुळे स्पिनर योग्य गोलदांजी करु शकले नाहीत. त्या दोन नोबॉल्समुळे आम्ही हरलो असे धोनी म्हणाला.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या वेस्ट इंडिजचा सामना आता इंग्लंडशी होणार आहे.