हे १९ क्रिकेटर सलग सहाव्यांदा टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार
पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप सुरु होतोय. सलग सहाव्यांदा या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या १९ क्रिकेटर्समध्ये भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप सुरु होतोय. सलग सहाव्यांदा या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या १९ क्रिकेटर्समध्ये भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.
यात महिला क्रिकेटर्सचाही समावेश आहे ज्या पाचव्यांदा या वर्ल्डकपच्या महाकुंभमेळ्यात भाग घेतील. भारताकडून मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांचा समावेश आहे.
पुरुषांच्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश संघातील पाच क्रिकेटर असे आहेत जे यापूर्वीच्या पाचही वर्ल्डकपमध्ये खेळलेत. यात मशरफी बिन मूर्तझा, शाकिब अल हसन, तामिम इक्बाल, मोहम्मदुल्लाह आणि मुशफिकर रहीम यांचा समावेश आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील प्रत्येकी तीन क्रिकेटर सलग सहाव्यांदा वर्ल्डकपमध्ये खेळणार आहेत. ड्वायेन ब्राव्हो, ख्रिस गेल, दिनेश रामदीन वेस्ट इंडिजकडून खेळले होते. नॅथन मॅकक्युलम, रॉस टेलर(दोन्ही न्यूझीलंड), एबीडे विलियर्स, जे पी ड्युमिनी(दोन्ही दक्षिण आफ्रिका), तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिगा(दोन्ही श्रीलंका), शाहीद आफ्रिदी(पाकिस्तान) आणि शेन वॉटसन(ऑस्ट्रेलिया) हे अन्य क्रिकेटर जे सलग सहाव्यांदा आयसीसी वर्ल्डकपमध्ये खेळणार आहेत.