तिलकरत्ने दिलशानची वनडे आणि टी-२० मधून निवृत्ती
श्रीलंकेचा एक धडाकेबाज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानने वनडे आणि टी-20 आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये तिसरा सामना हा त्याच्या करिअरचा शेवटचा वनडे सामना असेल.
कोलंबो : श्रीलंकेचा एक धडाकेबाज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानने वनडे आणि टी-20 आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये तिसरा सामना हा त्याच्या करिअरचा शेवटचा वनडे सामना असेल.
सीरीज ही 1-1 ने बरोबरीवर आहे. दांबुलामध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रविवारी ही तिसरी मॅच होणार आहे. कोलंबोमध्ये 9 सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात टी-20 सामना होणार आहे. हा त्याच्या करिअरमधला शेवटचा टी-२० सामना असेल.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या २ सामन्यांमध्ये दिलशानने 22 आणि दूसऱ्या सामन्यात १० रन केसे होते. ११ डिंसेबर १९९९ मध्ये दिलशानने जिम्बाब्वे विरोधात वनडे करिअर सुरु केलं होतं.
दिलशानने 329 वनडे सामन्यांमध्ये 10,248 रन केले आहेत. वनडे क्रिकेट मध्ये 10,000 हून अधिक रन बनवणारा दिलशान चौथा श्रीलंकेचा बॅट्समन आहे. त्याने टीमसाठी १०६ विकेट देखील घेतले आहेत. दिलशानच्या नावे क्रिकेटमध्ये एक शॉट खेळला जातो त्याला 'दिलस्कूप' असं म्हणतात. श्रीलंका क्रिकेट बोर्ड तीसरी वनडे दिलशानचा सन्मान म्हणून खेळणार आहे.