राजकोट : आयपीएलच्या दहाव्या पर्वातला तिसरा सामना आज सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. गुजरात लायन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा हा सामना आज रात्री ८ वाजता रंगणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा सामना आज गुजरात लायन्सच्या दिग्गज फलंदाजांशी होईल. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली लायन्स आज गौतम गंभीरच्या नाईट रायडर्सशी झुंजतील.

गेल्यावर्षी पदार्पणातच गुजरातच्या संघाने उत्तम कामगिरी केली होती. रँकिंगमध्येही हा संघ वरच्या क्रमांकात होता. मात्र क्वॉलिफायिंग सामन्यात चमकदार कामगिरी न केल्याने संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लागलं होतं. यावर्षी त्यांचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकणार नाही. त्याची उणीव संघाला नक्की भासेल.

कोलकाता नाईट रायडर्सकडे एक-एक तगडे खेळाडू आहेत. फक्त त्यांच्याकडून सर्वोत्तम अकरांची निवड झाल्यास जिंकणं कठीण नसेल. आंद्रे रसेल खेळण्यावर प्रतिबंध असल्याने आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. क्रिस वोक्स आणि इतर खेळाडू त्याची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतील. तसंच चायनामॅन कुलदीप यादवकडूनही चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

या खेळाडूंमधून असतील संघ-
कोलकाता नाईट रायडर्स - सुनिल नरीन, आंद्रे रसेल, शाकीब-अल-हसन, क्रिस लिन, गौतम गंभीर, कुलदीप सिंग यादव, मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, पियुष चावला, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, युसुफ पठाण, शेल्डन जॅक्सन, अंकीत सिंग रजपूत, ट्रेंट बोल्ट, क्रिस वोक्स, नॅथन कुल्टर-नाईल, रोमन पॉवेल, डॅरन ब्रावो, रिषी धवन, आर.संजय यादव, इशांक जग्गी, सायन घोष, कॉलिन डे ग्रँडहोम

गुजरात लायन्स - जेम्स फॉल्कनर, ब्रँडन मँक्युलम, ड्वेन ब्रावो, एरोन फिंच, ड्वेन स्मिथ, अँड्रु टे, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, प्रविण कुमार, इशान किशन, प्रदीप सांगवान, शिविल कौशिक, शदाब जकाती, जयदेव शाह, जेसन रॉय, चिराग सुरी, बसिल थांपी, मनप्रित गोनी, नाथु सिंग, तेजस सिंग बरोका, मुनाफ पटेल, अक्षदीप नाथ, शुभम अग्रवाल, प्रथम सिंग, शेली शौर्य