मुंबई : आयपीएलमध्ये बॅट्समन, बॉलरसह अनेक दिग्गज विकेटकीपर देखील पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये टॉप ५ विकेट किपरमध्ये धोनी नाही तर दिनेश कार्तिक हा पहिल्या स्थानावर आहे. कार्तिकने धोनीला याबाबतीत मागे टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या आधी वयाच्या १८ व्या वर्षी करिअरची सुरुवात करणाऱ्या या खेळाडूने मागील २ वर्षापासून आंतराराष्ट्रीय सामना नाही खेळला आहे. टीम इंडियाकडून तो या आधी टेस्ट, वनडे आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.


आयपीएलच्या टॉप-५ विकेटकीपर्समध्ये ४ भारतीय तर एक विदेशी खेळाडूचा समावेश आहे. 


आईपीएलमधील टॉप-५ विकेटकीपर 


१. दिनेश कार्तिक, गुजरात लायंस


कार्तिक आयपीएलमध्ये यंदा गुजरात लायंस टीमकडून खेळत आहे. या आधी तो दिल्ली डेअरडेविल्स, मुंबई इंडियंस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळला आहे. 


कार्तिकने १२५ मॅचमध्ये ८८ विकेट घेतले आहे. यामध्ये ६३ कॅच आणि २५ स्टंपिंगचा समावेश आहे. कार्तिकने १०८ इंनिगमध्ये ९ अर्धशतकांसह २२५७ रन्स केले आहे.


२. महेंद्र सिंह धोनी, राइजिंग पुणे


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतिशय यशस्वी राइजिंग पुणे सुपरजाइंट्सचा कर्णधार धोनी हा दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने १३२ मॅचमध्ये ५६ कॅच आणि २४ स्टंम्पिंग केले आहे. 


मागील ८ वर्ष तो चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार होता. आईपीएलमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्यांच्या यादीत धोनी सातव्या क्रमांकावर आहे.


३. अॅडम गिलक्रिस्ट, डेक्कन चार्जर्स, किंग्स इलेवन पंजाब


जगातील उत्कृष्ठ विकेटकीपर यांच्या यादीत गिलक्रिस्टचं नाव घेतलं जातं.  आईपीएलमध्ये ही त्याने चांगली कामगिरी केली आहे. गिलक्रिस्टने ८० मॅचमध्ये ५१ कॅच आणि १६ स्टंपिंग केले आहे. आईपीएलमध्ये २ शतकं झळकावणारा तो एकमेव विकेटकीपर बॅट्समन आहे.


४. रॉबिन उथप्पा, कोलकाता नाइट राइडर्स


उथप्पा हा आईपीएलमध्ये कोलकाता नाइटराइडर्सकडून खेळतो. तो नाइटराइडर्ससाठी ओपनिंग देखील करतो. त्याने १२४ मॅचमध्ये ४४ कॅच आणि २३ स्टंपिंग केले आहेत. 


उथप्पा याआधी मुंबई इंडियंस, पुणे वारियर्स इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याकडून ही खेळला आहे. आईपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत तो ६ व्या क्रमाकांवर आहे.


५. पार्थिव पटेल, मुंबई इंडियंस 


पार्थिव पटेल यंदा मुंबई इंडियंसकडून खेळतोय. टीममध्ये इंग्लंडचा विकेटकीपर जोस बटलर देखील आहे पण विकेटकिपिंगची जबाबदारी पटेलकडे आहे.


पटेलने ९७ मॅचमध्ये ४९ कॅच आणि १२ स्टंपिंग केले आहे. आईपीएलमध्ये तो ६ वेगवेगळ्या टीमकडून खेळला आहे. चेन्नई सुपरकिंग्स, डेक्कन चार्जर्स, कोच्चि टस्कर्स केरला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूरू आणि सनराइजर्स हैदराबादकडून तो आतापर्यंत खेळला आहे.