पुणे : कोलकाताविरुद्धच्या कालच्या सामन्यात धोनीच्या चतुरपणाची झलक पुन्हा पाहायला मिळाली. यष्टीमागून विकेट घेण्याची धोनीची कला अफलातून आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात पुन्हा हे पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आणि केकेआर सामन्यादरम्यान पुण्याने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८२ धावा केल्या. कोलकाता हे आव्हान करण्यासाठी मैदानात उतरली. सलामीवीर म्हणून गंभीरसोबत सुनील नरिने खेळपट्टीवर आला. 


यावेळी तिसऱ्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर गंभीरने फाईनलेगच्या दिशेने फटका लगावत एक धाव घेण्यासाठी तो धावला. यादरम्यान शार्दूल ठाकूरने चेंडूला धोनीकडे थ्रो केले. त्यानंतर धोनीने अनोख्या अंदाजात नरिनेला धावबाद केले. नरेनने या सामन्यात ११ चेंडूत १६ धावा केल्या.