नवी दिल्ली : टीम इंडियाचा उपकॅप्टन आणि आक्रमक क्रिकेटर म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीची एक नवी जाहिरात सध्या वायरल होताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अदिदास'च्या या टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातीतला संदेश काहीतरी हटके पद्धतीनं देण्यात आलाय. व्यक्तीनं प्रेम उमजून घ्यावं... आणि तिरस्काराचा वापर करून आपल्या आपल्या टार्गेटपर्यंत पोहचावं अशा काहीशा आशयाचा हा संदेश...


उल्लेखनीय म्हणजे, ही जाहिरात विराटनं आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केलीय. 'ज्या लोकांनी मला प्रेम दिलं त्यांचे आभार... आणि ज्या लोकांनी मला साथ दिली नाही त्यांचे खूप मोठे आभार... कारण त्यांच्याच तिरस्कारानं मला स्फूर्ती मिळाली. मी प्रेम उमजत राहील आणि तिरस्काराचा वापर करत राहिल'.