शेवटच्या षटकातील प्रत्येक बॉलसाठी विराटचा बुमराहला सल्ला
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने निर्णायक विजय मिळवला. भारताने ठेवलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १३९ धावांत आटोपला.
नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने निर्णायक विजय मिळवला. भारताने ठेवलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १३९ धावांत आटोपला.
इंग्लंडच्या संघाला शेवटच्या षटकात ८ धावा हव्या होत्या. मात्र या षटकात इंग्लंडला केवळ २ धावा करता आल्या. यासोबतच त्यांनी २ विकेटही गमावल्या. शेवटची ओव्हर बुमराहने टाकली होती. त्यालाच मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
त्या शेवटच्या ओव्हरमधील प्रत्येक बॉल टाकण्याआधी बुमराह विराटचा सल्ला घेत होता. तो प्रत्येक बॉल टाकण्यासाठी विराटला काय करावे असे विचारत होता. यावेळी विराटने त्याला नैसर्गिक शैलीत खेळण्याचा सल्ला दिला.
विराट त्याला म्हणाला, तुझ्या शैलीत तू खेळ. षटकार जरी ठोकला गेला तरी जग काही संपणार नाहीये. या ओव्हरमध्ये बुमरहाने कमाल केली आणि संघाला विजय मिळवून दिला.