पणजी : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं रिलेशनशीप, त्यांचं ब्रेक अप आणि ब्रेक अपनंतर पुन्हा पॅच अपबाबतच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चांवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं कायम मौनच बाळगणं पसंत केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघं एकत्र पाहायला मिळाले. सोमवारी आयएसएलच्या एफसी गोवा विरुद्ध दिल्ली डायनामोस एफसी या मॅचला विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं हजेरी लावली. गोव्यातल्या एफसी फतोर्डा स्टेडियममध्ये या दोघांनी फूटबॉलची मॅच पाहिली. विराट कोहली हा गोवा एफसी या फूटबॉल टीमचा सहमालक आहे.