मुंबई : आयपीएलमधल्या पहिली क्वालिफायर मॅच ही बंगळुरु आणि गुजरातमध्ये रंगली. बंगळुरुने कांटे की टक्करच्या या मॅचमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीली मात्र मंगळवारी लवकर विकेट गमवावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने २९ रन्सवर ५ विकेट गमावले होते त्यामुळे गुजरात लायन्स जिंकणार हे जवळपास अनेकांना वाटतं होतं पण डिविलियर्सने सावध खेळी केली नंतर धुवांदार खेळीमुळे आरसीबीसाठी विजय खेचून आणला. एबीने ४५ बॉलमध्ये ७७ रन करत मॅच जिकंवून दिली.


एबीच्या या खेळीवर विराटही फिदा झाला. सर्वश्रेष्ठ खेळांडूंच्या यादीत सध्या पहिल्या स्थानावर असलेल्या विराटने एबीचं खूप कौतूक केलं. कोहली बोलला की, ' ही अविश्वसनीय खेळी होती. मला विश्वास नाही होत आहे की मी विजयी कॅप्टन आहे. आता ही चर्चा संपली पाहिजे की जगातील सर्वात श्रेष्ठ खेळाडू कोण आहे.'


कोहली पुढे बोलला की, मोठ्या मॅचमध्ये मोठा खेळाडूच चालतो. मी त्याच्यापुढे नतमस्तक आहे. मी प्रेशरमध्ये असलेल्या जेवढ्य़ा इनिंग पाहिली आहे त्यातली ही सर्वात श्रेष्ठ इनिंग होती.