मुंबई : वर्ल्डकप टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात विजयाचा विराट कोहली शिल्पकार ठरला. विराटने पुन्हा एकदा भारताला विजय मिलवून दिला. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि तुटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने कालच्या मॅचमध्ये सर्वात जलद १५०० रन्स पूर्ण केले. कोहलीने ३९ व्या मॅचमध्ये हे रन्स करत क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला. गेलने १५०० रन्स करण्यासाठी ४५ मॅच खेळला होता. दोघेही रॉयल चॅलेंजर्स या टीमसाठी एकत्र खेळतात. गुरुवारी होणाऱ्या मॅचमध्ये दोघे ही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


१५०० रन्स बनवण्यासाठी विराटने ५५.४२ च्या रनरेटने हे रन्स केले. टी-२० मध्ये ५० रन्सहून अधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीने गेल आणि मॅक्युलमची बरोबरी केली आहे. 


गेलने टी-२० मध्ये २ शतकं आणि १३ अर्धशतकं लगावली आहेत तर मॅक्युलमने ही २ शतकं आणि १३ अर्धशतकं लगावली आहेत. विराटने १५ मॅचमध्ये ८ अर्धशतकं ठोकत ७३७ रन्स केले आहेत जो आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे.