रांची : भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे ओपनर्स रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरले आहेत. दोघांनी तीन सामन्यांमध्ये एकूण १०८ रन्स केले आहेत. तर मिडल ऑर्डरमध्ये मनीष पांडे आणि अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी असणार आहे. धोनी चौथ्या नंबरवर बॅटिंग करणार तर मग मॅच फिनिश करण्याची जबाबदारी ५ व्या क्रमाकावर येणाऱ्या पांडे आणि ६ व्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षर पटेलवर येणार आहे.


मनीष पांडे पहिल्या २ वनडेमध्ये जास्त नाही चालला. तिसऱ्या वनडेत विराटसोबत त्याने २८ रन केले. तर पटेलने अजून काही खास केलेलं नाही.


रांचीमध्ये विराटचा जबरदस्त रेकॉर्ड


टीम इंडियाने आत्तापर्यंत तीन वनडे मॅच खेळले आहेत. ज्यामध्ये दोनमध्ये विजय तर एक मॅच ड्रॉ ठरली होती. विराट कोहलीने २ सामन्यांमध्ये 77* आणि 139* रन्सची खेळी केली होती.


रांचीमध्ये श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये कर्णाधार मॅथ्यूजने 139* रन्सची खेळी केली होती तर विराटने देखील याच सामन्यामध्ये 139* रन्सची खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.


धोनी की स्ट्रॅटेजी


मोहाली वनडेमध्ये 80 रन करणाऱ्या धोनीने आतापर्यंत सीरीजमध्ये 140 रन केले आहेत. धोनीने आता चौथ्या क्रमांकावर येणं सुरु केलं आहे. बेस्ट फिनिशर म्हणून ओळख असणाऱ्या धोनीने म्हटलं की, स्ट्राइक रोटेट करण्यासाठी त्याची कॅपिसिटी कम होत आहे. त्यामुळे तो लवकर आला तर फायदा होईल.


सीरीज


पहिली वनडे : धर्मशालामध्ये टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय


दुसरी वनडे : दिल्लीमध्ये न्यूजीलंड 6 रन्सने विजयी.


तिसरी वनडे : मोहालीमध्ये टीम इंडिया 7 विकेट्सने विजयी.