रांची : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीसऱ्या टेस्ट मॅच दरम्यान भारताला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मैदानातून बाहेर झाला आहे.


३९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पीटर हँड्सकोम्बने रविंद्र जडेजाच्या बॉलवर एक जोरादार शॉट लावला त्याचा पाठलाग करतांना कोहलीने डाइव लावली. बॉलला अडवतांना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापत मोठी असल्याने कोहलीला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी अभिनव मुकुंदला फिल्डींगसाठी मैदानात बोलावण्यात आलं आहे. कोहली मैदानावर बॅटिंगसाठी उतरणार की नाही हा मोठा प्रश्न आता भारतीय संघापुढे आहे.