मुंबई : भारतात विराट कोहली हा सध्या अनेक तरुणींच्या हद्यावर राज्य करतोय. विराटचे अनेक फॅन्स आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होतच आहे. विराटची कामगिरी ही जगातील अनेकांना त्याचा चाहता होण्यासाठी मजबुर करते. जगभरातून विराटचं कौतूक होत. भारताच नाही तर भारता बाहेरही विराटला पसंत करणारे अनेक जण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये विराटसोबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि त्याची गर्लफ्रेंड डॅनी व्हिल्सही आहे. या फोटोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 


डॅनीही माजी जलतरणपटू आहे आणि लॉची विद्यार्थी आहे. स्मिथ आणि डॅनी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या साखरपुडा झाल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी रंगली होती.