विराट कोहलीवर बॉल कुरतडल्याचा आरोप
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस बॉल कुरतडण्याच्या प्रकारात दोषी आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवरही हा आरोप करण्यात आलाय. इंग्लंडमधील एका दैनिकाने हा आरोप केलाय.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस बॉल कुरतडण्याच्या प्रकारात दोषी आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवरही हा आरोप करण्यात आलाय. इंग्लंडमधील एका दैनिकाने हा आरोप केलाय.
राजकोटमधील सामन्यादरम्यान विराट कोहलीने बॉल कुरतडल्याचा आरोप या दैनिकाने केलाय. मात्र आयसीसीने या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलंय.
बॉल कुरतडण्या प्रकरणी आयसीसीच्या नियमानुसार जर एखादया संघाला विरुद्ध संघ अथवा त्या क्रिकेटपटूविरुद्ध बॉल कुरतडल्याप्रकरणात तक्रार दाखल करायची असल्यास कसोटी सामना संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत दाखल करणे गरजेचे असते.
राजकोट कसोटी सामना 13 नोव्हेंबरला संपला. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार 18 नोव्हेंबरपर्यंत ही तक्रार दाखल होऊ शकत होती. मात्र इंग्लंड संघाकडूनही कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाहीये.