मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात लायन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. मात्र हा लूक बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला चांगलाच फनी वाटलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाकडे पाहून त्याच्यावर हसत असल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. यात विराट जडेजाकडे पाहून इशारा करतोय. 


काल झालेल्या या सामन्यात बंगळूरुने २१ धावांनी बाजी मारली. ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी या सामन्यात धमाकेदार खेळी साकारतना यंदाच्या आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली.