दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या रँकिंगमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलेय. तर इंग्लंडला हरवल्यानंतर रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानी पोहोचलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलंदाजांच्या यादीत कोहलीनंतर दुसरा क्रमांक लागतो तो ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचचा. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानी आहे. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या आणि वनडेत तिसऱ्या स्थानी आहे. 


क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा कोहली हा पहिला फलंदाज आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी आहे तर इमरान ताहिर त्याच्याहून चार अंकानी मागे आहे.


आर. अश्विन या यादीत ८व्या स्थानी आहे तर आशिष नेहरा २४व्या स्थानी आहे. इंग्लंडचा ज्यो रुट ५व्या स्थानी आहे तर युझवेंद्र चहल ९२व्या क्रमांकावरुन ८६व्या स्थानावर पोहोचलाय.