ढाका :  भारत-श्रीलंका दरम्यान मंगळवारी एशिया कप सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा शानदार खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने ४७ चेंडूत ५६ धावा केल्यात. विशेष म्हणजे कोहलीने श्रीलंकेविरूध्द तीन टी-२० सामने खेळले. त्या तिन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले.  त्याने तीन सामन्यात ६८,७७ आणि काल ५६ धावांची खेळी केली. 



प्रत्येक सामन्यात विराट श्रीलंकेविरूद्ध यशस्वी होत आहे.  याचं गुपीत विराटने सांगितले आहे. याच्यामागे एक रणनिती आणि मेहनत असल्याचे विराटने पहिल्यांदा उघड केले. 


मॅचनंतर विराट कोहलीला विचारण्यात आले की, तो सामन्यात जास्त काळ क्रिजच्या बाहेर उभे राहून आक्रमकपणे खेळत होता.  त्यावर तो म्हणला, हा प्लान होता. कारण त्यांचे सर्व तेज गोलंदाज गुडलेथवर बॉलिंग करतात. 


त्यामुळे त्यांना संधीच दिली नाही की त्यांनी गुडलेंथला बॉलिंग टाकायला. तुम्ही २५ ते ३० रन केले तर नंतर पडणारे दव आपले काम करतो. चेंडू ओला झाल्यावर तुम्हांला सोपे होते. पण चेंडू बदलल्यावर तुम्हांला शॉट खेळण्याची पद्धत बदलावी लागते.