नवी दिल्ली : भारतीय टीमचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहलीने त्याच्या जीवनावर आधारीत पुस्तक 'ड्रिवन'चं प्रकाशन केलं. यावेळेस विराट खूपच भावूक झाला. यावेळेस  पूर्व कर्णधार कपिल देव, टीम इंडियाचे कोच अनिल कुंबळे, रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. विराटने या दरम्यान दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने हे देखील सांगितलं की, तो कोणाला अधिक घाबरतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या मते तो आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे त्याचं कारण फक्त त्याचे कोच राजकुमार शर्मा. त्यांच्या ओरडण्याला तो अधिक घाबरतो.


विराटने म्हटलं की, तो त्याचे कोच एकमात्र असे व्यक्ती आहेत ज्यांना तो घाबरतो. आजही मी त्यांना काहीच बोलू नाही शकत. हा त्यांच्याप्रती असलेला माझा सन्मान आहे. असे व्यक्ती तुमच्यासोबत असणं कधीही चांगलं असतं.


विराटने पुस्तक प्रकाशनावेळी म्हटलं की, त्याच्यासाठी संबंध देखील महत्त्वाचे आहेत. 1998 पासून आजपर्यंत त्याचे फक्त एकच कोच आहेत. ते कधीही नाही बदलणार. आयपीएलमध्ये देखील एकाच टीमकडून खेळतोय आणि हे देखील कधीच नाही बदलणार.