वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये कोहलीची डबल सेंच्युरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं डबल सेंच्युरी झळकावली आहे.
अँटिग्वा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं डबल सेंच्युरी झळकावली आहे. 281 बॉलमध्ये कोहलीनं आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली.
टेस्ट क्रिकेटमधली विराट कोहलीची ही पहिलीच डबल सेंच्युरी आहे. याआधी 169 रन ही कोहलीची टेस्ट क्रिकेटमधली सर्वाधिक धावसंख्या होती. कोहलीच्या या शानदार कामगिरीमुळे भारताचा स्कोअर 400 रनच्या पुढे गेला आहे. कोहलीला आर.अश्विननंही चांगली साथ दिली. आर. अश्विननं हाफ सेंच्युरी झळकावली.