मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष हे खऱ्या अर्थाने लकी म्हणावे लागले. यंदाच्या वर्षात विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या वानखेडेवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराटने पुन्हा एकदा द्विशतक झळकावले. यासोबतच दोनहून अधिक द्विशतके कऱणाऱ्यांच्या यादीत त्याने चौथे स्थान मिळवलेय. 


याआधी मायकेल क्लार्क, डॉन ब्रॅडमन आणि रिकी पॉटिंग यांच्या नावे या यादीत होती. या यादीत आता भारतीय खेळाडूच्या नावाचाही समावेश करण्यात आलाय. भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंना जे जमले नाही ते विराटने करुन दाखवलेय.


त्याने या वर्षातील सर्वात पहिले द्विशतक वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध आणि आता इंग्लंडविरुद्ध. तसेच एक कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी उत्तमच झालीये.