मुंबई: भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळताना कोहलीनं नुकतीच सेंच्युरी मारली आहे. टी 20 मधली विराट कोहलीची ही पहिलीच सेंच्युरी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र कोहलीचं सारं काही आलबेल नाही. अनुष्का शर्मासोबत त्याचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा होत्या. यानंतर मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं, तेव्हा या दोघांचं पुन्हा पॅच अप झाल्याचं बोललं गेलं. 


अनुष्कासोबतच्या या नात्याविषयी खुद्द विराट कोहलीलाच विचारण्यात आलं. याबाबत कोणालाही काही सांगायची मला गरज वाटत नाही, मी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं कोहली म्हणाला आहे.