मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील रिलेशनशिपचा विषय नेहमीच चर्चेचा राहिला. टी २० वर्ल्डकपदरम्यान यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर हे कपल पुन्हा एकत्र आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे तर दोघंही एकमेकांसाठी वेळ देतायत. गेल्या आठवड्यात विराटने चक्क अनुष्काच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन तिला सुखद धक्काच दिला. 


दोघंही चंदीगडच्या एअरपोर्टवरही एकत्र दिसले होते. तसेच हे दोघं एक हॉटेलमध्ये ५-६ दिवस राहिले होते असेही सांगितले जातेय. दरम्यान, मिड डेच्या बातमीनुसार विराटने अनुष्काजवळ राहण्यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च केलेत.