मुंबई : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा आयपीएल खेळताना दिसू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर, रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स या तिन्ही टीमनी अमेरिकेमध्ये काही मॅच खेळवण्यात याव्यात ही इच्छा व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेमध्ये असलेल्या भारतीय आणि दक्षिण आशियातील क्रिकेट रसिकांची संख्या लक्षात घेता, या टीमनी हा प्रस्ताव ठेवल्याचं सांगितलं जात आहे. 


रविवारी आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही टीममध्ये होणाऱ्या फायनलआधी आयपीएल अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हा मुद्दा येऊ शकतो, असं बोललं जात आहे. या प्रस्तावित मॅचच्या तारखांबाबत अजून काहीही निश्चित झालं नाही. 


भारताच्या झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्याच्या मधल्या वेळेमध्ये या मॅच होतील असं बोललं जात होतं, पण आता सप्टेंबरमध्ये या मॅच व्हायची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या हाऊस्टनमध्ये या मॅच होऊ शकतात.