नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमचा मेंटर म्हणून दिसणार आहे. आगामी आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमसाठी रणनिती बनवणं आणि निर्णय घेण्याचे अधिकार सेहवागला देण्यात आले आहेते. मेंटर म्हणून नियुक्ती होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं ट्विट सेहवागनं केलं आहे.


संजय बांगरनं पंजाबच्या प्रशिक्षक पदाचा डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. त्यानंतर आता सेहवागवर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. आयपीएलच्या आठव्या सीझनपासून सेहवाग पंजाबच्या टीमसोबत आहे. यंदा या टीमसोबत सेहवागचं तिसरं वर्ष असेल.