मुंबई: आशिया कपमध्ये भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहनं केलेल्या कामगिरीमुळे त्याचं सगळेच कौतुक करत आहेत. आणि आता यामध्ये पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनुसही बुमराहच्या बॉलिंगच्या प्रेमात पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रित बुमराहची यॉकर्र टाकण्याची क्षमता वाखणण्याजोगी आहे, असं वकार म्हणाला आहे. तसंच फास्ट बॉलरना फिट ठेवण्यासाठी कोचची नियुक्ती केली जाते. पण बॉलरलाही स्वत:च्या शरिराबाबत माहिती पाहिजे असंही वकार म्हणाला आहे. 


तसंच स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेला पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरच्या कामगिरीवरही वकार खुष आहे. कमबॅकच्या मॅचवेळी वेलिंग्टनमधल्या प्रेक्षकांनी आमिरला चिडवलं, पण तो शिक्षा भोगून आला आहे, आता तो बदलला आहे. त्यानं आता पाकिस्तानला मॅच जिंकवून द्यावा. मला आमिरविषयी काहीच आक्षेप नाही, असा सल्ला वकारनं दिला आहे.