मुंबई: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे, भारताचा फिरकीपटू आर अश्विनविरुद्ध मी रणनीती तयार केली आहे. यावर वॉर्नर म्हणतो, 'अश्विन विरूद्धची मी रणनीती ठरवली आहे, मात्र अश्विनसारख्या खेळाडूंबद्दल माझ्या मनात मानाचं स्थान आहे', कारण तो फलंदाजांचा विचार करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल झाला आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला २३  फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. 


'अश्विनची जी क्षमता लक्षात ठेवून मला फलंदाजी करायची आहे. त्याने त्याची तयारी केली असेल, माझीही रणनीती ठरली आहे. आम्हा दोघांमध्ये चांगली लढत होईल', असंही वॉर्नरने म्हटलं आहे.


भारताविरुद्धची मालिका आणि कर्णधार विराट कोहलीचा संदर्भ आला नाही असं होणार नाही, असं म्हणत वॉर्नरने कर्णधार कोहली देखील कौतुक केलं आहे.


कोहली बद्दल वॉर्नर म्हणतो...


कोहली सध्या प्रचंड फॉर्मात आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारात पारंगत आहे. संपूर्ण देशाच्या अपेक्षा तो पूर्णत्वाकडे नेत आहे. विराट हा पट्टीचा खेळाडू असून तो तोडीस तोड उत्तर देतो. ज्यो रुट, स्टीव्ह स्मिथ, फॅब ड्युप्लेसीस आणि विराट कोहली हे असे खेळाडू आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आल्यावर त्यांचा खेळ आणखी बहरतो. मोठ्या खेळी करणाऱ्यांमध्ये विराट हे एक उत्तम उदाहरण आहे'.