मोहाली : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी एक स्मार्ट कर्णधार आहे. मैदानावर त्याच्या स्मार्टनेसची प्रचिती येतेच. कर्णधारासोबतच तो उत्तम विकेटकीपिंगही करतो. याचाच प्रत्यय पुन्हा पुणे विरुद्ध पंजाबच्या सामन्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबविरुद्ध खेळताना नवव्या ओव्हरमध्ये अंकित शर्माच्या गुड लेंथ बॉलवर मनन व्होराने थर्ड मॅनच्या दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न केला मात्र धोनीने सुंदर विकेटकीपिंग करताना तो बॉल पायांच्या सहाय्याने अडवला. 


या सामन्यात पंजाबने पुण्यावर सहा विकेट राखून मात केली.