धोनीच्या `त्या` निर्णयामुळे युवराजला साकारता आली दीडशतकी खेळी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष क्रिकेटर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या वनडेतही धोनीच्या या चाणाक्षपणाची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर असे काहीही घडत नाही जे धोनीच्या नजरेतून सुटेल.
कटक : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष क्रिकेटर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या वनडेतही धोनीच्या या चाणाक्षपणाची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर असे काहीही घडत नाही जे धोनीच्या नजरेतून सुटेल.
दुसऱ्या वनडेत युवराज सिंग दीडशे धावांच्या जवळ असताना ४१व्या षटकात वोक्सच्या गोलंदाजीवर युवराजचा बाद झाल्याचे जोरदार अपील विकेटकीपर ख्रिस वोक्ससह इंग्लंडलच्या खेळाडूंनी केले. मात्र चाणाक्ष धोनीने थोडाही वेळ न दवडता युवराजला डीआरएस घेण्यास सांगितले.
विशेष म्हणजे आपण बाद झालो की नाही याबाबत खुद्द युवराजही साशंक होता. मात्र धोनीला शंभर टक्के खात्री होती युवराजच्या बॅटला बॉल लागण्याआधी बॉल बाऊन्स झाला. त्यामुळेच त्याने तातडीने युवराजला डीआरएस घेण्यास सांगितले.
धोनीच्या सांगण्याप्रमाणे युवराजने रिव्ह्यू मागितला आणि हा रिव्ह्यू भारताच्या बाजूने गेला. धोनीच्या या चाणाक्षपणामुळेच युवराजला त्याची दीडशे धावांची खेळी साकारता आली.