पणजी : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातील या विवाहसोहळ्यात युवराज आणि हेझल हे जोडपे प्रमुख आकर्षण असले तरी आणखी एका जोडप्याने सर्वांचेच लक्ष वेधले. या विवाहसोहळ्यास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी हजेरी लावली होती. 


तसेच मुकेश आणि नीता अंबानी, क्रिकेट रोहित शर्मा आणि त्याची पत्नी, झहीर खान, आशिष नेहरा हेदेखील उपस्थित होते. 


यावेळी अनुष्का आणि विराट यांनी गाण्यावर ठेका नाही धरला तरच नवल. अनुष्काने जिंदगी मिलेगी ना दोबारामधील एका गाण्यावर डान्स केला तर विराटने गंगम स्टाईलमध्ये डान्स केला.