शेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच जिंकत होतो मॅच - मुर्तजा
बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला अवघ्या एका रनानं पछाडलं.
बंगळूरू : बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला अवघ्या एका रनानं पछाडलं.
यानंतर बांग्लादेशचा कॅप्टन मुशरर्फ मुर्तजानं आपला पराभव मान्य केलाय. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच मॅच जिंकत होतो, असं मुर्तजा म्हणतोय.
याच शेवटच्या तीन बॉलवर बांग्लादेशनं तीन विकेटस गमावल्या... आणि खेळ खल्लास झाला...
आमच्या बॉलर्सनं चांगली कामगिरी केली. शेवटपर्यंत आम्ही एक एक रन बनवायला हवे होते. परंतु, आम्ही असं करू शकलो नाही, असं मुर्तजानं म्हटलंय.
आम्ही शेवटच्या तीन बॉल्सवर तीन विकेट गमावल्या तेव्हा आम्हाला केवळ दोन रन्स हवे होते. एकूणच पाहिलं तर आम्ही चांगली कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्धची मॅच सोडून आम्ही खूप चांगलं खेळलो, पण आजचा दिवस निराशाजनक राहिला, असंही मुर्तजानं म्हटलंय.