कोलकता: क्रिकेटच्या मैदानात अशक्य काहीच नाही, हे वेस्ट इंडिजनं सिद्ध करत पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. शेवटच्या ओव्हरला वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी तब्बल 19 रनची आवश्यकता होती, तेव्हा क्रेग ब्रेथवेटनं लागोपाठ 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला जिंकवून दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेग ब्रेथवेटनं 10 बॉलमध्ये नाबाद 34 रनची अफलातून खेळी केली, तर मारलॉन सॅम्युअल्सनं 66 बॉलमध्ये नाबाद 85 रन बनवल्या. 


या मॅचमध्ये टॉस जिंकून वेस्ट इंडिजनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, आणि इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 155 रनवर रोखलं. वेस्ट इंडिजकडून ब्रॅव्हो आणि ब्रेथवेटनं प्रत्येकी 3 तर सॅम्युअल बद्रीनं 2 विकेट घेतल्या. इंग्लंडच्या जो रुटनं 36 बॉलमध्ये 54 रन केल्या.  


दोन टी20 वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज ही पहिली टीम ठरली आहे. या आधी वेस्ट इंडिजनं 2012मध्ये श्रीलंकेला फायनलमध्ये हरवत पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.