मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीचा बॉलर चेहल म्हणतो की, विराट त्यांनी बॉलिंग करतांना पूर्ण स्वतंत्र देतो. जेव्हा तो आमच्या हातात बॉल देता तेव्हा म्हणतो की सिक्स नाही द्यायचा आहे. पण बॉलिंग करण्यासाठी पूर्णपणे तुमच्या मनाप्रमाणे करण्याचं स्वतंत्र देतो.


कोहलीच्या चांगल्या कामगिरीबाबत जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो बोलला की, कोहली खूप मेहनती आहे. तो त्याच्या फिटनेसवर खूप लक्ष्य देतो. तो अधिक वेळ जीम आणि प्रॅक्टीस नेटमध्ये घालवतो.


चहल पुढे म्हणतो की, आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्या टीममध्ये विराट कोहली, क्रिस गेल, एबी डीविलियर्स आणि शेन वॉटसन सारखे मोठे खेळाडू आहेत. यांच्यामुळे टीम मजबूत स्थितीत आहे.