मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला आहे. सुरवातीपासून या मॅचमध्ये भारत जिंकेल असं बहुतेक जणांना वाटत होतं, पण वेस्ट इंडिजच्या टीमनं भारताला दे धक्का दिला. 


ते दोन नो बॉल नडले ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला तो सिमन्स. पण सिमन्सला 82 रनच्या खेळीमध्ये 2 वेळा जीवनदान मिळाली. आधी आर.अश्विन आणि मग हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर सिमन्स कॅच आऊट झाला, पण हे दोन्ही बोल नो बॉल होते. 


क्रिस गेलविषयीच जास्त होमवर्क ?


वेस्ट इंडिजकडून मॅच फिरवण्याची ताकद क्रिस गेलकडे असल्याचीच चर्चा झाली. पण या मॅचमध्ये क्रिस गेल फेल गेला. पण वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या खेळाडूंनी मात्र गेलच्या अपयशाची कसर भासू दिली नाही. 


या मॅचसाठी भारतीय संघानं फक्त क्रिस गेलचाच धोका लक्षात घेत प्लॅनिंग केली होती का हा प्रश्न निर्माण झाला आहे. 


आर.अश्विनला फक्त 2 ओव्हर


या वर्ल्ड कपमध्ये आर.अश्विन भारताचं ट्रम्प कार्ड होतं. पण या मॅचमध्ये अश्विनला फक्त 2 ओव्हरच देण्यात आल्या. तर हार्दिक पांड्यानं मात्र आपल्या 4 ओव्हर पूर्ण केल्या. पांड्यानं आपल्या 4 ओव्हरमध्ये 43 रन दिल्या. 


दवानं घात केला


वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या इनिंगवेळी दव पडल्यामुळे भारतीय बॉलर्सना बॉल ग्रिप करणं कठीण होऊन बसलं. हे ही भारताच्या पराभवाचं कारण मानलं जात आहेत. 


टॉस ठरला महत्त्वाचा


दवाचा धोका लक्षात घेऊन वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे या मॅचमध्ये टॉसनंही महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनंही टॉस महत्त्वाचा ठरल्याची प्रतिक्रिया दिली आहे.