कराची : आशिया चषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर काही महिला आणि विद्यार्थ्यांनी पाक संघाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो विद्रूप करुन पोस्टर्स तयार केले. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अक्रम कमालीचा संतप्त झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“लोकांनी आपल्या क्रिकेट टीमची मस्करी करताना लाज वाटायला हवी.”, असे रागाच्या भरात अक्रम म्हणाला.


महिला आणि विद्यार्थ्यांनी पाकिस्तान संघाच्या निषेधार्थ जे पोस्टर्स तयार केले होते, त्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या फोटोंना मेकअप करुन त्यांना विद्रूप करण्यात आलं होतं, त्यावरुन वसीम अक्रम कमालीचा नाराज झाला.