भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची नांगी
भारतीय गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर वेस्ट इंडिजच्या संघाने अक्षरश नांगी टाकली.
अँटिग्वा : भारतीय गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर वेस्ट इंडिजच्या संघाने अक्षरश नांगी टाकली.
मोहम्मद शामी, उमेश यादव आणि अमित मिश्राच्या धारदार गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची पळता भुई थोडी झाली. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजांना फॉलोऑन टाळता आला नाही. दिवसअखेरीस वेस्ट इंडिजसंघाची 1 बाद 21 धावा अशी दयनिय अवस्था झाली आहे.
दिवसअखेरपर्यंत मोहम्मद शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी चार बळी तर,अमित मिश्राने दोन आणि इशांत शर्माने एक बऴी मिऴवत वेस्ट इंडिजच्या फंलदाजीला खिंडार पाडले.