दिल्ली : जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही या सर्वांच्याच औत्सुक्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यानं हे विधान केलं.


'कोणत्याही गोष्टी १००% घडतीलच असं नसतं. आपण दोन वर्षांनंतरचं शेड्युल्ड आत्ताच प्लॅन करू शकत नाही, कारण दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. भारतीय क्रिकेटविषयी बोलायचं झाल्यास काहीच सांगता येत नाही, कारण दोन वर्षांनंतर आपण विंटेज कार होण्याचीही शक्यता असते', ही वेदनाही त्याने अलगद बोलून दाखवली.


तर धोनीचे कोच केशव बॅनर्जी यांनी एकदा म्हटलं होतं की, 'येत्या जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी चँपियन्स ट्राफीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यात जर धोनीची कामगिरी उत्तम राहिली तर तो २०१९चा वर्ल्डकप खेळेल.'