मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि शाहरुखच्या केकेआरमध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. या मॅचमध्ये शाहरुख खान वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहणार का याची उत्सुकता वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईविरुद्धच्या मॅचवेळी वानखेडे स्टेडियमवरच्या सुरक्षा रक्षकाबरोबर शाहरुखची बाचाबाची झाली होती. यानंतर शाहरुखवर एमसीएनं बंदी घातली होती अखेर ही बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख वानखेडेवर येतो का हे थोड्याच वेळात समजणार आहे.